उन्हाळी मोफत हॉकी प्रशिक्षण शिबिरास प्रारंभ.
बेळगाव :
हॉकी बेळगाव तर्फे उन्हाळी मोफत हॉकी प्रशिक्षण शिबिरास दि. 10 एप्रिल पासून प्रारंभ झाला आहे. सदर शिबिर दररोज सकाळी 6.30 ते 8.30 व सायंकाळी 4.30 ते 6.30 नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान (लेले ग्राउंड) येथे आयोजित करण्यात आले आहे.
प्रशिक्षणार्थी मुला-मुलींना दररोज नारी शक्तींच्या केळी, दुध व अंडी देण्यात येतात. यावेळी सुधाकर चाळके, प्रकाश कालकुंद्रीकर, सविता हेब्बार, उत्तम शिंदे उपस्थित होते.
सदर प्रशिक्षण शिबिरात 10 वर्षापासून 21 वर्षांपर्यंत मुला-मुलींनी सहभाग घेतला आहे. प्रशिक्षक उत्तम शिंदे, नामदेव सावंत, गणपत गावडे, प्रशांत मंकाळे, सुधाकर चाळके आदी प्रशिक्षण देत आहेत.
प्रशिक्षण शिबिरात खासबाग, अनगोळ, चन्नमा नगर, वडगाव, भाग्यनगर, गणेशपूर, खानापूर, गुंजी, निहूर आदी भागातून 45 मुला-मुलीनी सहभाग घेतला आहे.
तसेच आज अ. भा. हॉकी टुर्नामेंटसाठी हॉकी बेळगाव वरिष्ठ मुलांचा संघ हुबळी येथे 18,19,20 रोजी होणाऱ्या सामन्यासाठी रवाना झाला, अशी माहिती प्रकाश कालकुंद्रीकर यांनी दिली.