शुक्रवार पासून सुरु होणार महादेव पाटलांचा प्रचार
बेळगाव:
बेळगाव लोकसभा मतदारसंघाचे महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार महादेव पाटील यांचा प्रचाराचा शुभारंभ करण्यात येणार आहे. बेळगाव तालुक्याची आराध्य दैवत उचगावची ग्रामदेवता श्री मळेकरणी देवी मंदिरात पूजन करून शुक्रवारी दि. 12 रोजी प्रचार आरंभ करण्यात येणार आहे.
उचगाव येथे सकाळी 9:30 वाजता मळेकरणी देवीची पूजा करून प्रचार कार्याला सुरुवात करण्यात येणार आहे.
बेळगाव शहर आणि तालुक्यातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी शेकडोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष रणजीत चव्हाण पाटील आणि
तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर म ए समितीचे नेते रमाकांत कोंडुसकर आर एम चौगुले आणि ॲड अमर येळळूरकर यांनी केले आहे.