आज नियोजनासाठी शहर आणि तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची संयुक्त बैठक
बेळगाव:
आगामी लोकसभा निवडणुकीच्या नियोजनासाठी शहर आणि तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची संयुक्त बैठक गुरुवारी दुपारी 4:00 वाजता आयोजित करण्यात आली आहे.
बेळगाव शहरातील मराठा मंदिर रेल्वे ओवर ब्रिज येथे या संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले असून या बैठकीत लोकसभा निवडणुकी संदर्भात नियोजन ठरविले जाणार आहे.
बैठकीला निवड समिती सदस्य शहर महाराष्ट्र आणि तालुका महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन शहर समितीचे कार्याध्यक्ष रणजीत चव्हाण पाटील आणि तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांनी केले आहे.