बेळगावात अंगावरील कपडे काढून महिलेला मारहाण
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील वंटमुरी गावात एका महिलेला अर्धनग्न अवस्थेत बेदम मारहाण झाल्याची घटना गेल्या वर्षी घडली होती अशीच घटना बेळगाव शहरातील वडरवाडी येथे घडली. बेळगाव येथील वडरवाडी येथे वेश्याव्यवसायाच्या आरोपावरून महिला व तिच्या मुलीला शेजाऱ्यांनी मारहाण करून त्यांचे कपडे फाडले.
वड्डर वाडी येथे आई आणि मुलगी एकाच घरात राहतात. शेजारील कुटुंब महिलेवर वेश्या व्यवसायाचा आरोप करत आहेत. घरी वारंवार कोणीतरी अनोळखी व्यक्ती भेट देत असतात. याचा राग धरून सदर महिलेच्या घरावर शेजाऱ्यांनी हल्ला करून आई आणि मुलीला ओढून बाहेर आणले आणि त्यांच्या अंगावरील कपडे फाडून मारहाण केली.
याप्रकरणी माळ मारुती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.