न्यू गुडशेड रोड येथे साडेसात लाखाचा दारूसाठा जप्त
बेळगाव
शहरातील मध्यवर्ती ठिकाणी गुडशेडरोड येथे गोवा बनावटीचा 7 लाख 30 हजार रुपयाचा दारूसाठा जप्त करण्यात आला. होळी आणि रंगपंचमीसाठी ही दारू गोव्याहून टाटा एस या वाहनातून आज मंगळवारी पोचली होती. राकेश अनिल चौगुले या वाहन चालकाने गुडशेड रोडवरील आपल्या घराजवळ टाटा एस हे चार चाकी वाहन उभे केले होते. पोलिसांच्या खबऱ्याने ही माहिती खडेबाजार पोलीस स्टेशनला कळल्यावर लागलीच खडेबाजार पोलीस स्टेशनचे एएसआय आनंद, ए.बी.शेट्टी, पद्मजा, रुद्राप्पा या पोलीस कर्मचाऱ्यांनी टाटा एस. हे वाहन ताब्यात घेऊन त्याला अटक करण्यात आली. पकडण्यात आलेल्या दारू साठ्याची किंमत 7 लाख 30 हजार रुपये आणि टाटा एस. या वाहनाची किंमत सुमारे 3 लाख रुपये अशी एकूण 10 लाख 30 हजार रुपये असा मुद्देमाल पकडण्यात आला.अशी माहिती पोलीस उपायुक्त जगदीश यांनी दिली. याप्रसंगी डीएसपी शेखरप्पा उपस्थित होते.