
गणाचारी गल्ली येथे समुदाय भवन वरून राडा…
गणाचारी गल्ली येथे समुदाय भवन वरून राडा…
बेळगाव
गणाचारी गल्ली येथे समुदाय भवन आणि खाटीक समाज देवस्थान बांधकामावरून उद्भवलेला वाद चिघळला आहे. मंगळवारी सायंकाळी गणाचारी गल्लीतील नागरिक आणि खाटीक समाजातील प्रमुख नेत्यांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी खडेबाजार पोलिसांनी यामध्ये हस्तक्षेप करून दोन्ही गटातील नागरिकांना हुसकावून लावले. यावेळी किरकोळ दगडफेक झाल्यामुळे काही सदस्य जखमी झाले. काही सदस्यांना पोलीस स्टेशनमध्ये अटक करून ठेवण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले.