कोल्हापूर जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे यांची बेळगावला धावती भेट.
बेळगाव –
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख प्राध्यापक सुनील शिंत्रे यांची बेळगावला धावती भेट.
बेळगावात चाललेल्या एकंदर प्रकारावर सविस्तर चर्चा झाली. मराठी माणसांवर बेळगाव प्रशासनाकडून होणाऱ्या अन्यायाबद्धल त्यांना माहिती दिली. त्याचबरोबर हिंडलगा येथे होणाऱ्या हुतात्मा स्मारकाच्या कामात लाल पिवळ्या संघटना बेळगाव प्रशासनावर दबाव घालून आडकाठी आणत आहेत. हे थांबण्यासाठी महाराष्ट्रातल्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करावी अशी विनंती त्यांना आम्ही केली.
आम्ही सीमावासीयांच्या सोबत आहोत आणि हा अन्याय थांबवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू अशी ग्वाही प्रा सुनील शिंत्रे यांनी दिली.
शिवसेना कोल्हापूर जिल्हाप्रमुख प्रा.सुनील शिंत्रे, युवा सेना जिल्हाप्रमुख अवधूत पाटील, युवा समिती-सीमाभाग चे अध्यक्ष शुभम शेळके, सरचिटणीस मनोहर हुंदरे, उपाध्यक्ष प्रवीण रेडकर, उपखजिनदार इंद्रजीत धामाणेकर, नरेश पाटील, सुभाष धुमे आदी उपस्थित होते.