मिरज माहेर मंडळाची 2024 या वर्षातील शेवटची वार्षिक मिटिंग संपन्न.
बेलगाव:
मिरज माहेर मंडळाची 2024 या वर्षातील शेवटची वार्षिक मिटिंग सुखद देशपांडे , आदर्श नगर यांच्या घरी झाली. प्रथम मंडळाच्या सदस्या शोभा कदम यांचे अचानक निधन झाले, त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली व ठरलेली वार्षिकसहल रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर संक्रांत हळदीकुंकू देण्यात आले. तसेच वार्षिक बक्षीस समारंभ करण्यात आला.जुन्या कार्यकारिणीत कार्यरत असलेल्या सदस्यांचे त्यांनी केलेल्या वर्षभरातील उत्कृष्ट कार्या साठी विषेश कौतुक करण्यात आले. तसेच 2025 च्या नवीन वर्षाच्या कार्यकारणी साठी अध्यक्ष – अस्मिता आळतेकर , खजिनदार – सुखद देशपांडे, सेक्रेटरी – दिपा बापट यांची एकमताने निवड करण्यात आली व त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.