“कॅपिटल वन” सोसायटीचा १७ वा वर्धापन दिन सोहळा नुकताच पार
बेळगाव :
“कॅपिटल वन” सोसायटीचा १७ वा वर्धापन दिन सोहळा नुकताच पार पडला. संस्थेच्या १७ व्या वर्धापन दिनाचे औचित साधून संस्थेच्या प्रधान कार्यालयात लक्ष्मी पूजन करण्यात आले. यावेळी संस्थेचे चेअरमन श्री शिवाजीराव हंडे, व्हाईस चेअरमन श्री शाम सुतार संचालक, सर्वश्री सदानंद मारुती पाटील, शरद परशराम पाटील, रामकुमार राजाराम जोशी, शिवाजीराव नागेंद्र अतीवाडकर, संजय भालचंद्र चौगुले. सौ. भाग्यश्री लक्ष्मीकांत जाधव, सौ. नंदा सुभाष कांबळे यांच्यासह सोसायटीचे सर्व शाखांचे व्यवस्थापक व कर्मचारी वर्ग, तसेच पिग्मी संकलक वर्ग उपस्थित होता.