हुबळी येथील तरुणीच्या हत्येप्रकरणी बेळगावात अभाविप ची निदर्शने.
बेळगाव:
हुबळी येथील नेहा हिरेमठ या तरुणीच्या खून प्रकरणाचा निषेध करत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने आज बेळगावात तीव्र आंदोलन छेडण्यात आले होते. यावेळी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली.
हुबळीच्या बीव्हीबी महाविद्यालयातील विद्यार्थिनी नेहा हिरेमठ हीच लव्ह जिहादच्या कारणावरून झालेल्या निघृण हत्येचा निषेध करत बेळगावात अभाविपच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने करून सरकारविरोधात संताप व्यक्त केला. फ्लो.
यावेळी अभाविपचा विद्यार्थी रोहित उमनाबादिमठ बोलताना म्हणाला, भाजपच्या वतीने नेहा हिरेमठ याच्या खुनाचा निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यात येत आहे. गृहमंत्र्यांनी नेहाच्या खुनामागचे कारण सांगितले असले तरी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली असल्याचा आरोप या विद्यार्थ्याने केला. अनेकजण कायदा हातात घेत असून याविरोधात राज्य सरकारने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. अशा आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी रोहित अलकुंटी, प्रशांत शिलिकेरी, रोहित उमनाबादिमठ, सचिन हिरेमठ, अमूल्य गौडर, प्रज्वल अन्नीगेरी, मल्लिकार्जुन पुजारी आदींसह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.