महाकुंभमेळ्याहून परतताना भीषण अपघात; 4 ठार
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिरातून परतत असताना झालेल्या भीषण रस्ते अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला तर १६ जण गंभीर जखमी झाले. आज (७ फेब्रुवारी) पहाटे ४ वाजता इंदूर जिल्ह्यातील मऊ तहसीलमधील मानसुरा परिसरात दुचाकी, ट्रॅव्हलर आणि टँकरमध्ये अपघात झाला. या भीषण अपघातात दोन दुचाकीस्वारांसह चार जणांचा जागीच मृत्यू झाला. इतर दोघांचा रुग्णालयात उपचाराशिवाय मृत्यू झाला. मृतांपैकी दोघांची ओळख पटली आहे ती नीता आणि सागर अशी असून ते बेळगावातील गणेशपुर येथील आहेत.यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या वाहनाने प्रथम एका दुचाकीला आणि नंतर एका टँकरला धडक दिली. अपघाताची तीव्रता पाहता चार जणांचा जागीच मृत्यू झाला. इंदूरमधील एका खाजगी रुग्णालयात आणखी दोघांचा मृत्यू झाला. १६ जखमींवर उपचार सुरू आहेत. एका मुलावर बालरोग अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. उपचार घेणाऱ्यांपैकी बहुतेकांना फ्रॅक्चर झाले आहे.या अपघातात, धर्मपुरी येथील हिमांशू आणि सेंध्या येथील शुभम मन्सूर हे दुचाकीस्वार जागीच मृत्युमुखी पडले.” अपघाताचे कारण शोधण्यासाठी अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली आहे. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत,” असे पोलिस ठाण्याचे एसआय रवी यांनी सांगितले