नगरसेवक गिरीश धोंगडी ह्यांनी सोडविले वॉर्ड क्र. 24 मधील पिण्याचे पाणीचे समस्या.
बेळगाव : प्रतिनिधी
वॉर्ड क्र. 24 मधील लोकांना पिण्याचे पाणी पुरवठा सुरळीत नसल्यामुळे त्रस्त झाले होते. या वॉर्डाचे नगरसेवक गिरीश धोंगडी ह्यांच्या लक्षात येताच बेळगाव दक्षिणचे आ. अभय पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनानुसार सगळ्या सरकारी आणि एल अँड टी चे कर्मचारी,वरिष्ठ अधिकारी आणि वालव मन सर्वांना बोलवून,शिवाजी महाराज उद्यान, शहापुर येथे बैठक घेतले.अनेक समस्या सोडविण्यासाठी मार्गदर्शन व सुचनाही केले.
यावेळी एल अँड टी अधिकारी ने आश्वासन दिले की दर पाच दिवसाआड पाणी सोडलं जाईल.गिरीश धोंगडी यांनी सांगितलं की जर काही तांत्रिक अडचणी मुळे पाणी सोडणार नसतील तर अधिकरिनी तसे कळवावे जेणे करून लोकांना त्रास होणार नाही.ते पुढे सर्व वालव मन आणि कर्मचारी वर्गांचा त्यांच्या कामाची कौतुक आणि आभार व्यक्त केले.
ह्या वेळी एल अँड टी विभाग अधिकारी रवीकुमार व सुधीर पाटील सह अन्य कर्मचारी उपस्थित होते.