टिळकवाडी शारीरिक शिक्षक संघटनेच्या अध्यक्षपदी विवेक पाटील यांची निवड
बेळगाव :
टिळकवाडी माध्यमिक शारीरिक शिक्षक संघटनेच्या अध्यक्षपदी विवेक पाटील व सचिवपदी एच. बी.पाटील यांची फेरनिवड करण्यात आली आहे. मालतीबाई साळुंखे शाळेच्या सभागृहात नुकत्याच झालेल्या शारीरिक शिक्षकांच्या बैठकीत वरील निर्णय घेण्यात आला.
2023 – 24 सालाकरिता टिळकवाडी शारीरिक शिक्षक संघटनेच्या अध्यक्षपदी विवेक पाटील ठळकवाडी स्कूल, उपाध्यक्ष सिल्वीया डिलिमा डीपी स्कूल, सचिव एच. बी. पाटील दिलीप दामले स्कूल, सहसचिव जयसिंग धनाजी जी. जी. चिटणीस, खजिनदार उमेश बेळगुंदकर बालिका आदर्श, उपखजिनदार रामलिंग परिट व्हीएम शानभाग स्कूल, हिशोब तपासणी चंद्रकांत पाटील संत मीरा, यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
तसेच सदस्य व सल्लागार मंडळ म्हणून अशोक बुडवी, अर्जुन भेकणे,देवकुमार मंगण्णाकर, उमेश मजुकर, प्रवीण पाटील, ब्रिजेश सोलोमन, चिदानंद असोदे, पी. एस. कुरबेट, मयुरी पिंगट,संध्या वर्मा, शिला सानिकोप्प, श्रीहरी लाड, संतोष दळवी यांची निवड करण्यात आली आहे.
या बैठकीत सचिव एच. बी. पाटील यांनी मागील वर्षाचा जमाखर्च सादर केला व याला सर्वानी मंजुरी दिली तसेच आगामी काळात होणाऱ्या विविध क्रीडा स्पर्धा व शालेय स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी मिळून कार्य करावयाचे असून संघटना बळकट करण्यासाठी सर्वांनी हातभार लावावे असे आवाहन अध्यक्ष विवेक पाटील यांनी केले.