चित्रदुर्गजवळ भीषण अपघात : पाच जण ठार तर
चित्रदुर्ग :
राष्ट्रीय महामार्गावर चित्रदुर्ग ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत मल्लापूर गावाजवळ भीषण अपघात झाला असून त्यात एकाच कुटुंबातील चार सदस्य आणि अन्य एका मित्रासह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. संगनबसव (३६), खासगी बँकेत कर्मचारी, त्यांची पत्नी रेखा (२९), सात वर्षीय अगस्त्य, नातेवाईक भीमा शंकर आणि भीमाशंकर यांचा KGF मधील मित्र मधुसूदन यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृत दाम्पत्याचा आणखी एक मुलगा आदर्श, मुलगी अन्विका आणि कार चालक जखमी झाले असून त्यांना चित्रदुर्ग जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
विजयपूर जिल्ह्यातील बसवनबागेवाडी तालुक्यातील कुडरी सलवादगी गावातील हे सात जण सुटीच्या दिवशी कारने चिक्क मंगळूरला जात होते. काल रात्री अकरा वाजता हे कुटुंब कारने घरून निघाले होते. राष्ट्रीय महामार्गावर मल्लापूर गावाजवळ आज पहाटे एका कारची मागून येणाऱ्या लॉरीला धडक बसली. या धडकेत कारमधील पाच जण ठार तर तीन जण जखमी झाले. मधुसूदनचा उपचाराविना मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच सध्या मृतांचे कुटुंबीय चित्रदुर्ग येथे गेले आहेत.