रात्रीच्या अंधारात कार आंबोली घाटात दरीत कोसळली
सावंतवाडी :
आंबोली घाटात दरड कोसळल्याने मध्य प्रदेशातील पर्यटकांची कार मध्यरात्री खोल दरीत कोसळली. मात्र, सुदैवाने कोणतीही दुखापत झाली नाही. ही कार दरीत झाडाला अडकल्याने प्रवाशांचा जीव वाचला. भरधाव वेगामुळे कार दरीत कोसळल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलिस हवालदार दत्ता देसाई आणि हवालदार राजेश नाईक यांनी तेथे जाऊन घाटाखाली अडकलेल्या तीन प्रवाशांना बाहेर काढले. रात्री अंधारात प्रवासी अडकले होते. तरीही अंधारातून पोलिसांनी तेथे जाऊन त्यांना मदत करून आंबोलीत आणले.