चॅलेंजिंग स्टार दर्शनाला अटक…..
म्हैसूर:
चॅलेंजिंग स्टार दर्शनला म्हैसूर पोलिसांनी अटक केली आहे. अभिनेता दर्शनला एका हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
रेणुका स्वामी यांच्या हत्येप्रकरणी अभिनेता दर्शनला अटक करण्यात आली आहे. म्हैसूर येथील फार्म हाऊसमध्ये असलेल्या दर्शनला पोलिसांनी अटक केली आहे.
चित्रदुर्गातील रेणुका स्वामी यांनी पवित्रा गौडा यांना अश्लील मेसेज आणि फोटो पाठवल्याचा आरोप करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणातील तीन आरोपी काल पोलिसांना शरण आले. आता या प्रकरणी पोलिसांनी अभिनेता दर्शनसह 10 जणांना अटक केली आहे.