बस आणि ट्रकचा टक्कर : सात जण ठार

बस आणि ट्रकचा टक्कर : सात जण ठार

मुंबई :

महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात मंगळवारी नागपूर -पुणे महामार्गावर बसची ट्रकला धडक बसून झालेल्या अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेत 13 जण जखमी झाले असून त्यांना स्थानिक शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन वाहने अतिवेगाने जात असल्याने हा अपघात झाला. वेग जास्त असल्याने दोन्ही वाहनांचे पूर्णपणे नुकसान झाल्याचे पोलिसांनी सांगितले. अपघात होताच स्थानिकांनी मदतकार्यात जुंपले आणि अनेकांना बाहेर काढले. त्यांना नंतर रुग्णालयात नेण्यात आले, असे पोलिसांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous post 24 मे रोजी शहर, उपनगरात उद्या विद्युत पुरवठ्यात व्यत्यय.
Next post वादळी वाऱ्यामळे शहापुर स्मशान भूमी येथील पत्रे उडून नुकसान.