24 मे रोजी शहर, उपनगरात उद्या विद्युत पुरवठ्यात व्यत्यय.
बेळगाव :
सदाशिवनगरमधील विद्युत पुरवठा उपकेंद्रात दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने या उपकेंद्रातून शहर आणि उपनगराला बुधवार दि. २४ सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत बंद वीजपुरवठा राहणार आहे. याचा पाणीपुरवठ्यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. हेस्कॉमने दिलेल्या माहितीनुसार किल्ला भाजी मार्केट, पाटील गल्ली, भांदूर गल्ली, ताशिलदार गल्ली,
रविवार पेठ, अनंतशयन गल्ली, कुलकर्णी गल्ली, शेरी गल्ली, फुलबाग गली, मठ गली, कलमठ गली, मध्यवर्ती बस स्थानक, शेट्टी गली, यासह संपूर्ण शहरात विद्युत पुरवठा खंडित होणार असल्याचे कळविण्यात आले आहे.