मराठा महासंघाने कर्नाटक परिवहन बसवर काळी शाईने निषेध .
25 नोव्हेंबर 22,
पुणे : मराठा महासंघाने कर्नाटक परिवहन बसवर काळ्या शाईने निषेध लिहून निषेध व्यक्त करण्यात आला.
पुणे जिल्ह्यातील दौंड येथे निपाणी-औरंगाबाद बसवर ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘जाहिर निषेध शब्द काळ्या शाईने लिहून निषेध व्यक्त करण्यात आला.
कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यातील सीमावाद वाढत असताना, कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादावरील कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या वक्तव्याविरोधात मराठा महासंघाने 25 नोव्हेंबर रोजी पुण्यात आंदोलन केले.
निषेधाचे चिन्ह म्हणून महासंघानी पुण्यात राज्य आणि कर्नाटक दरम्यान धावणाऱ्या बसेसवर ‘ जाहिर निषेध’, ‘जय महाराष्ट्र’ असे लिहिले.