केएलई कॅन्सर रुग्णालयाचे आज उद्घाटन

बेळगाव :
केएलईच्या संपतकुमा डॉ एस. शिवांगीकॅन्सर हॉस्पिटलचे उद्घाटन आज शुक्रवार दि. ३ रोजी होणार आहे. हा सोहळा ३० डिसेंबररोजी होणार होता. मात्र माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आल्यानंतर हा सोहळा शुक्रवारी ३ रोजी सायंकाळी ४ वाजता होईल, अशी माहिती केएलईचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांनी दिली. उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होईल.

राज्यपाल थावरचंद गेहलोत, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, वैद्यकीय शिक्षण मंत्री शरणप्रकाश पाटील, जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी, खासदार जगदीश शेट्टर, आ. राजू सेट, आ. अभय पाटील,काहेरचे कुलगुरु आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव कार्यक्रमस्थळी पाण्याच्या बाटल्या, हँडबॅग, छत्री, मोबाईल आणि इतर वस्तू आणण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत, कार्यक्रमाला दुपारी ३ पर्यंत उपस्थित राहण्याचे आवाहन केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांनी केले आहे. कॅन्सर हॉस्पिटल सुमारे १ लाख ७५ हजार चौरस फुटांत असून ३०० खाटांची व्यवस्था आहे. कॅन्सरवर उपचार करण्यासाठी पुणे, बंगळूर, मुंबईसह इतर ठिकाणी जावे लागत होते. मात्र आता बेळगावात रेडिओथेरेपी, किमोथेरेपीसह कॅन्सरसंबधीचे सर्व उपचार एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous post जनतेचा पाठिंबा आणि कार्यकर्त्यांची मेहनत हेच या यशाचे सूत्र आहे : आ. अभय पाटील.
Next post युवा मेळाव्याला उपस्थित राहून सीमालढ्याला बळकटी द्या– शिवाजी हावळणाचे