खानापूर येते विधनाभा निवडणुकी साठी तिकीट – पॅकिटची साटेलोट
खानापूर:
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पक्षाकडून निरीक्षक टीम म्हणून आलो आहोत. उमेदवार निवडीसाठी आम्ही तुम्हाला तिकीट मिळवून देतो तुम्ही आमचे हात ओले करा, अशाप्रकाचे साटेलोटे खानापूर तालुक्यात होत असल्याची चर्चा सध्या खानापूरात रंगली आहे.
कोणता उमेदवार किती ताकदवर आहे याचा सर्व्हे करण्यासाठी आम्ही निरीक्षक म्हणून आलो आहोत असे सांगत इच्छुक उमेदवारांना उमेदवारीचे लालूच दाखविण्याचे प्रकार हल्लीच्या राजकारणात सर्रास पाहायला मिळते. या अमिषाला बळी पडलेले खानापूर तालुक्यातील इच्छुक उमेदवार आपली पुढील पाच वर्षांची तजवीज करण्याच्या पाठीमागे लागले आहेत.
सध्या उमेदवारी मिळविणे म्हणजे “लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट” अशी स्थिती निर्माण झाली आहे. राष्ट्रीय पक्षाची निरीक्षक टीम खानापूर तालुक्यातील इच्छुकांकडून स्वतःची पोळी भाजून घेण्यात मात्र चांगलीच मग्न आहे. या निरीक्षकांच्या गाजराला भुलून अनेक तथाकथित नेते आपल्या राजकीय कर्तृत्वापेक्षा पैशाचे वजन वापरून उमेदवारी मिळविण्याचा खटाटोप करताना दिसत आहेत.
यामध्ये किती इच्छुकांचे किती पैसे जाणार व नेमकी उमेदवारी कोणाला मिळणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. ही खरच राष्ट्रीय पक्षाची निरीक्षक टीम आहे की हा केवळ एक बनाव आहे हे पाहणे गरजेचे ठरते आहे.