आ.अभय पाटील यांच्या पुढाकाराने बेळगाव उद्योजकांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा.

आ.अभय पाटील यांच्या पुढाकाराने बेळगाव उद्योजकांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा.

 

बेळगाव प्रतिनिधी

बेळगावात ऑटोमोबाईल उद्योगाला प्राधान्य क्रमाने चालना देण्यासाठी प्रभावी योजना राबविण्यात येतील अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली आहे. खा. इरण्णा कडाडी आणि आ. अभय पाटील यांच्या नेतृत्वाखालील उद्योजकांच्या शिष्टमंडळाने गुरुवारी बेंगलोर येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सदर आश्वासन दिले आहे. त्यामुळे बेळगावात नजीकच्या काळात ऑटोमोबाईल उद्योगासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकार होतील असा विश्वास उद्योजकांनी व्यक्त केला आहे.

उद्योजकांच्या मुख्यमंत्र्यांशी झालेल्या या भेटीवेळी बेळगाव शहर आणि जिल्ह्याच्या विकासासंदर्भातील विविध प्रश्नांवर चर्चा झाली. बेळगाव हा राज्याच्या आर्थिक विकासासाठी आणि औद्योगिक विकासासाठी महत्त्वाचा जिल्हा आहे. या पार्श्वभूमीवर मोठे उद्योग उभारल्यास औद्योगिक विकास अधिक वेगाने होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

बेळगावमध्ये फाउंड्री आणि हायड्रॉलिक उद्योगांना चालना देण्यासाठी फाउंड्री पार्क उभारण्याच्या शिष्टमंडळाच्या विनंतीला प्रतिसाद देताना मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना जमीन ओळखून संपादित करण्याचे निर्देश दिले.

मुंबई-चेन्नई कॉरिडॉरवर बेळगाव जिल्ह्यात इंडस्ट्रियल टाऊनशिपही तयार केली जाणार आहे. याचा लाभ व्यावसायिकांनी घ्यावा, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला.या भागातील औद्योगिक विकासाला पूरक ठरणाऱ्या पहिल्या 5 प्राधान्य प्रकल्पांपैकी एक म्हणून बेळगाव – कित्तूर – धारवाड रेल्वे प्रकल्पाचा विचार करण्याची विनंती केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना करण्यात आली आहे. हा प्रकल्प शासन प्राधान्याने राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी बेळगाव जिल्ह्यात वस्त्रोद्योग स्थापन करण्यासाठी पुढे येण्याचा सल्ला देत बेळगाव दौऱ्यात उद्योजकांची स्वतंत्र बैठक घेऊन बेळगावातील उद्योगांच्या विकासाबाबत चर्चा करणार असल्याचे सांगितले. या भीतीवेळी बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज,लघुउद्योग भारती , लघुउद्योजक संघटना आणि विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous post आ.अभय पाटील यांच्या पुढाकाराने बेळगाव उद्योजकांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा..
Next post खानापूर येते विधनाभा निवडणुकी साठी तिकीट – पॅकिटची साटेलोट