दोन मुलींवर सामूहिक अत्याचार करून ब्लॅकमेल करणाऱ्या तिघांना अटक
बेळगाव :
रायबाग तालुक्यातील सवसुद्दी गावाजवळील डोंगराळ ■भागात दोन मुलींवर सामूहिक अत्याचार झाला असून तिघांनी – मिळून अत्याचार केला आहे. – या अमानुष घटनेची माहतिी न पोलिसांना मिळताच अभिषेक, आदिल जमादार आणि चालक कौतुक बडिगेर या तिघांना – पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाबाबत बेळगाव – जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. – भीमाशंकर गुळेद म्हणाले, आरोपी अभिषेकची एका मुलीशी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून भेट झाली. त्याने मुलीला सांगितले की आपण सौंदत्तीला जात आहोत. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून, पीडित मुलीने तिच्या मैत्रिणीला सोबत घेतले आणि दोघेही बसस्थानकाकडे निघाले. तेथे आरोपी अभिषेक पीडित मुलींना अर्टिगा कारमध्ये घेऊन गेला. तिन्ही आरोपी एर्टिगा कारमध्ये होते. पीडित मुलींना रायबाग तालुक्यातील सवसुद्दी गावाजवळील डोंगराळ भागात नेण्यात आले. त्यांनी ३ जानेवारी रोजी दुपारी मुलींवर अत्याचार केले आणि गोव्यात येण्यासाठी ब्लॅकमेल केले. पीडित मुलींनी याबाबत घरी माहती दिली. त्यानंतर पीडित मुलगी तिच्या चुलत भावासह आली आणि तिने १३ जानेवारी रोजी हारुगेरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार दाखल केल्यानंतर २४ तासांत दोन आरोपींना अटक करण्यात आली.