आ.अभय पाटील यांच्या प्रयत्नांमुळे वैश्यवाणी समाजाच्या कार्यकारिणी मंडळाची आणि मुख्यमंत्र्यांची बेंगळूर येथे भेट.
बेळगाव
बेळगाव दक्षिणचे आ. अभय पाटील आपले शब्द कधीही पडू देत नाहीत याचेच उदाहरण म्हणजे वैश्य वाणी समाजाचे कार्यकारिणी मंडळ आणि मुख्यमंत्र्यांची भेट..
हल्लीच वैश्य वाणी समाजाच्या कार्यकारिणी मंडळाने बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांना भेटून आपली समस्या मांडली होती, त्यावेळी आमदार अभय पाटील यांनी त्वरित ,मुख्यमंत्र्यांबरोबर संवाद साधून गुरुवार ची वेळ घेऊन ही भेट घडवून आणली.
बेळगांवमधील वैश्यवाणी समाजाचे अध्यक्ष दत्त कणबर्गी आणि वैश्यवाणी समाजाच्या कार्यकारिणीने दि. 24 नोव्हेंबर रोजी मा.मुख्यमंत्री बसवराज बोम्मई जी यांच्या बेंगळूर येथील निवासस्थानी त्यांची भेट घेऊन वैश्यवाणी समाजाला जातीचे प्रमाणपत्र न मिळाल्याने राज्यातील सुमारे अडीच लाख वैश्यवाणी बांधवाना ज्या समस्या उद्भवत आहेत याबाबत सविस्तर चर्चा केली.
यावेळी मा.मुख्यमंत्र्यांनी रेव्हेन्यू प्रिन्सिपल सेक्रेटरी एन.जयराम यांना ह्या संदर्भात योग्य ते निर्देश देऊन लवकरात लवकर ह्या समस्या सोडवून जातीचे प्रमाणपत्र मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनीही यासाठी पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली.
बेळगावच्या इतिहासात प्रथम च आमदार अभय पाटील यांच्या प्रयत्नांमुळे वैश्य वाणी समाजाच्या समस्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडण्याची संधी उपलब्ध झाली यासाठी आमदार अभय पाटील यांच्यावर वैश्य वाणी समाजाकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
यावेळी याठिकाणी दत्ता कणबर्गी ,रोहन जु व ळी ,प्रविण पिळणकर ,रवी कलघटगी ,अमित कुडतूरकर आदी उपस्थित होते.