नवी दिल्ली :
छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे नक्षलीहल्ल्यात 11 जवान शहीद झाल्याची माहिती मिळत आहे.दंतेवाडातील अरनपूरच्या जंगलात नक्षलवाद्यांनी डिस्ट्रिक्ट रिजर्व गार्ड (डीआरजी) च्या जवानांवर हल्ला केल्याची माहिती मिळत आहे. आयईडी ब्लास्टमध्ये तब्बल 11 जवान शहीद झाले आहेत.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दंतेवाडाच्या अरनपूर पोलीस ठाण्यांतर्गत माओवादी कॅडरची उपस्थिती असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. आज दंतेवाडा येथून नक्षलविरोधी अभियानासाठी डीआरजी दल पाठवण्यात आलं होतं. डीआरजी पथक परतत असताना अरनपूर रस्त्यावर आयईडी स्फोट घडवून आणला. या स्फोटात 10 डीआरजी जवान आणि ऑपरेशनमध्ये सहभागी एक ड्रायव्हर शहीद झाला.