अभय पाटील यांना उपनगरी भागात भरघोस पाठिंबा.
बेळगाव :
आमदार अभय पाटील यांच्या निवडणूक प्रचाराला आज भवानी नगर येथून त्यांच्या प्रचार फेरीला प्रारंभ करण्यात आला.कावेरी कॉलनी, चेन्नम्मा नगर, हिंदू कॉलनी आणि सुभाषचंद्र नगर, कालीबाग कॉलनी, ब्रम्हा नगर येथे सुरुवात झाली.
आमदार अभय पाटील यांनी गेल्या ५ वर्षात केलेल्या विकासाला जनतेने बिनशर्त पाठिंबा दर्शवत अभय पाटील यांना पुन्हा निवडून आणण्याचा निर्धार केला आहे
आपल्या क्षेत्रात अभाय पाटील यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे. उपनगरी भागात झंझावती प्रचारकार्य गतिमान झाले असून, कार्यकर्ते मतदारांशी सातत्याने संपर्क साधून मतदानाचे आवाहन करीत आहेत. मतदारांच्या भेटीगाठी घेण्यासाठी उमेदवार अभय पाटील आणि या भागातील नगरसेवक सातत्याने कार्यरत आहेत.