बेळगाव:
बेळगाव दक्षिण मतदार संघातील भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार अभय पाटील यांच्या प्रचारार्थ मंगळवारी उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री डॉक्टर केशव प्रसाद मौर्य बेळगावला आले. डॉक्टर केशव प्रसाद मौर्य यांनी मंगळवारी दिवसभर दक्षिण मतदार संघातील विविध ठिकाणी जाऊन मतदार आणि मान्यवरांच्या भेटी घेतल्या.
बुधवारी त्यांनीआपल्या व्यस्त वेळा पत्रकात सुधा वेळ काढून वॉर्ड क्र. ४२ चे नगरसेवक अभिजीत जवळकर यांच्या कार्यालयाला भेट दिली. नगर सेवक अभिजीत जवळकर यांनी त्यांचा सत्कार केला. अभय पाटील यांच्याबद्दल केशव प्रसाद मौर्य यांना विचारले असता ते म्हणाले कि जो माणूस जनतेसाठी काम करतो आणि त्यांचा हितासाठी लढतो तो कधीच हरणार नाही आणि अभय पाटील हे मागच्या वेळेपेक्षा अधिक मतांनी निवडुन येतील यात शंका नाही.
अभिजीत जवळकरांनी वेळात वेळ काढून आल्याबद्दल डाॅ. केशव प्रसाद मौर्य यांचे व ही संधी दिल्या बद्दल अभय पाटील यांचे देखील आभार मानले. या कार्यक्रमात प्रतिष्ठित नागरीक संजय पोतदार, नितिन चिप्रे, संजु दोड्डानावर उपस्थित होते आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.