काँग्रेस सरकारची पहिली विकेट पडली? नागेंद्र यांच्या राजीनाम्याची मुख्यमंत्र्यांची नोटीस.
बेंगळुरू:
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारची पहिली विकेट पडली आहे. वाल्मीकी विकास घोटाळ्यात अनुसूचित जमाती कल्याण मंत्री बी. नागेंद्र यांचे नाव झळकले होते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बी. नागेंद्र यांना राजीनामा देण्याचे सुचविले .
बी. नागेंद्र यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधी पक्ष भाजपने सरकारवर दबाव आणला होता. या पार्श्वभूमीवर सरकारवर दबाव निर्माण झाला, मुख्यमंत्री सिद्धरामय्या बी. नागेंद्र यांना राजीनामा देण्याच्या सूचना दिल्या आहेत.
या घोटाळ्याबाबत मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांची गुरुवारी (३० मे) बैठक झाली. बैठकीत मंत्री बी. नागेंद्र यांच्या राजीनाम्याची चर्चा झाली. बैठकीत सरकारला लाज वाटू नये, म्हणून बी. नागेंद्र यांनी राजीनामा देणेच योग्य आहे. बैठकीनंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या बी. नागेंद्र यांना स्वत:हून राजीनामा देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.