भारताचा महान फुटबॉलपटू सुनील छेत्रीची फुटबॉलमधून निवृत्ती
नवी दिल्ली –
भारताचा महान फुटबॉलपटू आणि भारतीय संघाचा कर्णधार सुनील छेत्री याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले. आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंपैकी एक असलेल्या भारताचा अनुभवी कर्णधार छेत्री याने गुरुवारी, 16 मे रोजी सकाळी एका व्हिडिओद्वारे निवृत्तीची घोषणा केल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला.
कुवेतविरुद्धचा विश्वचषक पात्रता सामना हा ( त्याचा) देशासाठीचा शेवटचा सामना असेल, असे गेल्या दीड दशकांहून अधिक काळ भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 39 वर्षीय सुनीलने सांगितले. 6 जून रोजी हा सामना होणार आहे. मात्र, आपण क्लब बेंगळुरू एफसीकडून खेळत राहू, असे त्याने स्पष्ट केले.