अटल अलंकरण पुरस्काराबद्दल ज्योती कोरी यांचे अभिनंद.
बेळगाव:
अटल भारत स्पोर्ट्स अँड कल्चरल असोसिएशन, भारत आणि एच.आर.एच. श्रीमंत राजमाता विजय राजे सिंधिया फाउंडेशनने यांच्या संयुक्त विद्यमाने पुरस्कृत प्रतिष्ठेचा ‘अटल अलंकरण पुरस्कार’ प्राप्त केल्याबद्दल स्वीमर्स क्लब बेळगावच्या जलतरणपटू ज्योती कोरी यांचे केएलई संस्थेचे अध्यक्ष डाॅ. प्रभाकर कोरे यांनी खास अभिनंदन करून मुक्तकंठाने प्रशंसा केली.
बेळगाव जिल्हा आरोग्य खात्याच्या कर्मचारी असलेल्या ज्योती कोरी बेळगावच्या आघाडीच्या महिला जलतरणपटू असून त्यांनी आतापर्यंत विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये एकूण 67 सुवर्ण, 14 रौप्य आणि 8 कांस्य पदके पटकावत जलतरणात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. मध्य प्रदेशातील उज्जैन येथे अटल भारत स्पोर्ट्स अँड कल्चरल असोसिएशन, भारत आणि एच.आर.एच. श्रीमंत राजमाता विजयराजे सिंधिया फाउंडेशनने यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच झालेल्या एका सोहळ्यात त्यांना क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल ‘अटल अलंकरण पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले. ज्योती कोरी या बेळगाव येथील केएलईच्या ऑलिम्पिक आकाराच्या सुवर्ण जेएनएमसी जलतरण तलावात पोहण्याचे प्रशिक्षण घेत सराव करतात. ज्योती यांना जलतरण प्रशिक्षक उमेश कलघटगी, अक्षय शेरेगर, अजिंक्य मेंडके, नितीश कुडूचकर, गोवर्धन काकतकर यांचे प्रशिक्षण व मार्गदर्शन तसेच डॉ. प्रभाकर कोरे (चेअरमन, केएलई सोसायटी), श्री. जयंत हुंबरवाडी (अध्यक्ष, जयभारत फाउंडेशन), रो. अविनाश पोतदार, श्रीमती मानेक कपाडिया, श्रीमती लता कित्तूर, सुधीर कुसाणे, प्रसाद तेंडोलकर आणि इतरांचे प्रोत्साहन लाभत आहे. उपरोक्त पुरस्कार मिळाल्याबद्दल ज्योती कोरी यांचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.