शरद पवार , संजय राऊत आणि सुनील राऊत यांना जीवे मारण्याची धमकी.
नवी दिल्ली :
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना व्हॉट्स
अप आणि वेबसाईटच्या माध्यमातून आज सकाळी जीवे
मारण्याची धमकी मिळाली. यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्त्वाखालील शिष्टमंडळाने मुंबई पोलिस
आयुक्तांची भेट घेतली. धमकी देणाऱ्यांवर तात्काळ
कारवाई करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली आहे.
त्यानंतर माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की,
महाराष्ट्रात दडपशाही आणि गुंडाराज सुरू आहे. त्यामुळे
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना माझी विनंती आहे की
त्यांनी महाराष्ट्रात घडणाऱ्या घटनांमध्ये जातीने लक्ष
घालावे, अशी विनंती सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या, माझ्या व्हॉट्स अपवर आण एका वेबसाईटवरून शरद पवार यांना जीवे मारण्याची
धमकी देण्यात आली आहे. राजकारणात मतभेद असतात पण हा द्वेष दुर्दैवी आहे. महाराष्ट्रात सध्या दडपशाही आणि गुंडाराज सुरू आहे. यातून काही बरं वाईट झाल्यास याला केंद्र आणि राज्याचे गृहखाते जबाबदार राहील, असा अप्रत्यक्ष इशारा देखील सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांना दिला आहे. तसेच गृहविभागाने या घटनेची तातडीने दखल घेत, कारवाई करावी, अशी मागणी देखील सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
शरद पवार यांच्यापाठोपाठ संजय राऊत आणि सुनील राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.