” जोर का झटका,जोर से लागा” वाढीव वीज बिल विरोधात मानवाधिकार संघटना.
बेळगाव :
काँग्रेस सरकार निवडून आल्या नंतर जे गॅरंटी दिलें होतें ते पूर्ण करायचा सोडा तर नागरिकांना आणि त्रसात टाकलेत. लोकांचात काँग्रेस सरकार विरुध्द आक्रोश वाढत आहे.एकीकडे राज्य सरकारकडून वीज बिल 200 युनिटपर्यंत माफ करण्याची घोषणा केली जात असतानाच दुसरीकडे वीज दरवाढीचा झटका देण्यात आला आहे. यामुळे जून महिन्यात 3 ते 4 पट्टीने वाढीव वीज बिलाचा शॉक देत आहे.
यामुळे ग्राहकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात आता मानवाधिकार संघटनेच्या माध्यमातून लढा उभा करण्यात येणार आहे अशी माहिती या संघटनेचे पदाधिकारी अश्विनी लेंगडे , राम बनवानी आणि इतर सदस्यांनी पत्रकारांना दिली. सोमवारी हेस्कॉम च्या कार्यालयावर जाऊन अधिकारी वर्गाला याचा जाब विचारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
वाढीव वीज बिलाचा फटका केवळ घरगुती ग्राहकच नाही तर व्यावसायिक ग्राहकांनाही बसत आहे. आधीच उद्योगधंदे वाढत्या महागाईमुळे होरपळत असताना त्यातच आता वाढीव वीज बिल भरावे लागणार आहे. लघुउद्योजक, लहान व्यापारी यांना या दरवाढीचा सर्वाधिक फटका बसणार आहे.असे त्यांनी सांगितले