फरारी अमृतपाल सिंगला अटक

पंजाब:

फरारी अमृतताल सिंग – जो एका महिन्याहून अधिक काळ फरार होता – याला रविवारी पहाटे पंजाबमधील मोगा येथून अमृतसर ग्रामीण एसएसपी सतींदर सिंग यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अटक केली.पंजाब पोलीस आणि राष्ट्रीय गुप्तचर यांच्या संयुक्त प्रयत्नांनी ही अटक करण्यात आली.

पोलीस सूत्रांनी  सांगितले की खलिस्तानी समर्थक नेत्याला आसामच्या दिब्रुगड तुरुंगात हलवले जात आहे जिथे त्याच्या संघटनेचे इतर सदस्य आधीच बंद आहेत.

सिंग यांना मार्चमध्ये ‘फरार’ घोषित करण्यात आले होते  पंजाब पोलिसांनी त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात शोध सुरू केला होता.पंजाब पोलिसांनी खलिस्तान समर्थक नेत्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायदा (NSA) अंतर्गत गुन्हाही दाखल केला होता.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous post एस. वी.रोड नागरिकांचा अभय पाटील यांना जाहीर पाठिंबा
Next post अभय पाटील यांना गवळी समाजाकडून जाहिर पाठिंबा