बेळगाव:
बेळगाव दक्षिणमधून भाजपचे उमेदवार अभय पाटील यांना गवळी समाजाने अपला पाठिंबा जाहिर केले आहे .अभय पाटील यांच्या प्रचारासाठी टिळकवाडी विभागातील गवळी समाजाच्या प्रचार सभेत पाठिंबा जाहिर करण्यात आले . त्यावेळी अभय पाटील यांनी आपल्या विकास कामांची माहिती दिली.
अभय पाटील यांनी गवळी समाजाच्या विकासासाठी नेहमीच सहकार्य केले आहे .त्यामुळे या खेपेस पुन्हा एकदा त्यांना विजयी करण्यात येईल अशी ग्वाही गवळी समाजाच्या नेत्यांनी दिली. गवळी बांधवांच्या समस्यांची आपल्याला चांगलीच जाणीव आहे .त्यासाठी आपण सातत्याने त्यांच्या सोबत राहिलो आहे आणि येणाऱ्या काळात समाजाच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी कृतीशील उपायोजना राबविण्यात येतील असे अभय पाटील यांनी ग्वाही दिली.याावेली कार्यकर्ते आणि गवळी समाज उपस्थीत होता.