जनतेचा पाठिंबा आणि कार्यकर्त्यांची मेहनत हेच या यशाचे सूत्र आहे : आ. अभय पाटील.

सांगली जिल्ह्यात भाजपचा दणदणीत विजय – अभय पाटील

एक महिन्याच्या मेहनतीचे फळ, अभय पाटील

5 क्षेत्रात स्पर्धा, 4 मध्ये शानदार विजय!

जनतेचा पाठिंबा आणि कार्यकर्त्यांची मेहनत हेच या यशाचे सूत्र आहे : आ. अभय पाटील.

बेळगाव;

महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. सांगली जिल्ह्यातील पाच मतदारसंघात भाजपने निवडणूक लढवली आणि चार प्रमुख मतदारसंघात विजय मिळवला.

बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी या निवडणुकीत प्रभारी म्हणून काम केले असून जस तेलंगणा येथे प्रभारी म्हणून काम करताना संघटनेचे काम बळकट करून पक्षांनी दिलेली जबाबदारी योग्यरित्या पार पडत 8 सीट जिंकून आपला कौशल्य दाखवले तसेच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी तीन महिने सतत परिश्रम घेऊन, विजय खेचून आणून, छत्तीसगढ तेलंगणा प्रमाणेच महाराष्ट्रातही मानाचा तुरा रोवल्या आणि तेच या विजयाचे प्रमुख कारण ठरले. 

बेळगावात बोलताना ते म्हणाले, या विजयासाठी आम्ही गेल्या तीन महिना पासून मेहनत घेतली आहे. जनतेचा पाठिंबा आणि कार्यकर्त्यांची मेहनत हेच या यशाचे सूत्र आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

हा निकाल भाजपसाठी महाराष्ट्रात आपले स्थान मजबूत करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय समीकरण बदलून पक्ष कार्यकर्त्यांमध्ये नवउत्साह निर्माण झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous post संजीवीनी फौंडेशनमध्ये ११११ दिव्यांची आरास करून साजरा केला दीपोत्सव