जम्मू मधील लष्कराच्या ट्रकला भीषण आग, पाच जवानांचा मृत्यू

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यातलष्कराच्या वाहनाला भीषण आग लागली. या आगीमुळे पाच जवानांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिलेआहे.

पूंछमधील भिंबर गल्ली येथून तोटा गल्ली येथील लष्कराच्या ट्रकमधून रॉकेलची वाहतूक करण्यात येत होती.मात्र, चालत्या ट्रकला भररस्त्यात भीषण आग लागली.यामुळे पाच जवानांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडल्याने पूंछ येथे वीज कोसळली. यामुळे वाहनाला आग लागल्याची माहिती स्थानिकांनी दिली.

“भारतीय लष्करातील पाच जवानांनी या आगीत आपले जीव गमावले आहेत”, अशी प्रतिक्रिया जम्मूतील संरक्षण खात्यातील जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous post भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी वरिष्ठ पक्ष नेत्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केले
Next post उद्या पारंपारिक पद्धतीने शिवजयंती साजरी होणार; 27 मे रोजी मिरवणूक