बेळगाव उत्तर मधील भाजपचे उमेदवार डॉ. रवी पाटील आणि दक्षिण मधील भाजपचे उमेदवार अभय पाटील यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. या निमित्ताने जोरदार शक्तिप्रदर्शन झाले. त्यामुळे शहरातील वातावरण दुमदुमले होते. भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी वरिष्ठ पक्ष नेत्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केले. शहरातील प्रमुख मार्गांवरून भव्य मिरवणूक काढून अर्ज दाखल करण्यात आले .
वाहनांमधून उभे राहून नागरिकांच्या शुभेच्छांचा स्वीकार करीत ही मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भारतीय जनता पक्षाचे प्रभारी अरुण सिंग यांच्यासह अनेक पक्षनेते उपस्थित होते. त्यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला.
उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस असल्यामुळे अनेक उमेदवारांनी आणि त्यांच्या समर्थकांनी अर्ज भरणा केंद्रांचा परिसर व्यापला होता .