बेळगाव : मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव महामंडळ शहापूर विभागाची बैठक श्री. नेताजी जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.शनिवार दिनांक 22 एप्रिल रोजी पारंपारिक शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे तरी सर्व पदाधिकारी व शिवभक्तानी शहापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे सकाळी 9.30 वाजता उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले.
तसेच यावेळी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने 24 एप्रिल रोजी होणारी शिवजयंती चित्ररथ मिरवणूक पुढे ढकलण्यात आली असून 27 मे रोजी चित्ररथ मिरवणूक काढण्यात येईल याची नोंद वडगाव व शहापूर येथील सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळानी घ्यावी.
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे शहापूर विभाग प्रमुख भास्कर पाटील व बाजीप्रभू ढोलताशा पथकातील मृत सदस्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव महामंडळ शहापूर विभागाच्या सचिव पदी श्रीकांत कदम यांची निवड करण्यात आली, सूचक महादेव पाटील आणि अनुमोदन नेताजी जाधव यांनी दिले.
बैठकीला महादेव पाटील, श्रीकांत प्रभू, हिरालाल चव्हाण, सचिन केळवेकर, संजय पाटील, चंद्रकांत पोटे, सचिन अजरेकर, युवराज पाटील, आनंद पाटील आदी उपस्थित होते.