समृद्धी महामार्गावर ठाण्यात मोठी दुर्घटना,16 मजुरांचा मृत्यू

समृद्धी महामार्गावर ठाण्यात मोठी दुर्घटना,16 मजुरांचा मृत्यू

शहापूर :

काही दिवसांपूर्वी बुलढाणा येथे समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला होता. या अपघातात २६ जणांचा मृत्यू झाला होता. त्या अपघाताच्या आठवणी ताज्या असताना समृद्धी महामार्गावर पुन्हा मध्यरात्री मोठा अपघात झाला आहे. महामार्गावर पुलाचे काम सुरू असताना ग्रेडर मशिन कोसळली. या अपघातात १६ जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी मध्यरात्री शहापूर तालुक्यातील सरलांबेजवळ घडली.

जखमींना रुग्णालयात सरळ आंबा जवळील समृद्धी महामार्गाचे काम सुरू आहे. यावेळी तयार झालेले सिमेंटचे पुलाचे भाग उचलणारे महाकाय मशीन कोसळले. त्याखाली अनेक कामगार दाबले गेले आहेत. आतापर्यंत १७ पैकी १६ जणांचा मृत्यू झाला आहे. एका जखमीला शहापूर उपजिल्हा रुग्णालयात तर दोन जखमींना कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले आहे.

१ ऑगस्ट रोजी दुसरा मोठा अपघात या महामार्गावर झाला आहे. शहापूरजवळ सरळ आंबाजवळ समृद्धी महामार्गाचे काम सुरु असताना हा अपघात झाला. त्या ठिकाणी २२ कर्मचारी काम करत होते. त्यात १६ जणांचा मृत्यू झाला आहे. अजून पाच ते सहा जण अडकले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous post धबधब्याजवळ अधिकाऱ्यांची मस्ती: चार कर्मचाऱ्यांविरुद्ध तक्रार दाखल करण्याचे डीसीचे निर्देश
Next post नितीन जाधव यांच्या संपर्क कर्यालया मध्ये आधार कार्ड वरती मोबाईल नंबर अपडेट कॅम्प संपन्न.