आ. अभय पाटील आयोजित रांगोळी स्पर्धेमधून उमटले कल्पकतेचे प्रतिबिंब
बेळगाव प्रतिनिधी
दीपावली हा दिव्यांचा सण आहे त्याचबरोबर कल्पकतेचा आणि त्यामधून साकारणाऱ्या रांगोळ्यांचा देखील सण आहे . ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून बेळगाव दक्षिणचे आ. अभय पाटील यांनी सोमवारी रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले होते. आपल्या घरासमोर उत्तम प्रकारच्या रांगोळीचे रेखाटन करून महिलावर्गाने याला उत्तम प्रतिसाद दिला. भारतीय संस्कृतीच्या सणांमध्ये नेहमीच काहीतरी खास आनंद लुटणारे बेळगावचे आमदार अभय पाटील यांनी आपल्या दक्षिण मतदारसंघात रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले होते.
कलांमध्येही विविधता आहेत. पण त्या सर्व परंपरा आणि संस्कृतींमध्ये रांगोळीला एक विशेष महत्त्व आहे आणि तिला स्वतःचा मान आहे. रांगोळी कलाकारानी स्वच्छ भारत अभियान, शेतकरी हा देशाचा कणा आहे असे विषय देखील साकारले. काही कलाकारांच्या रांगोळीत कालिका देवी अवतरली.देशभरात सुपरहिट ठरलेल्या कांतारा या चित्रपटाचा सीन रांगोळीत फुलला होता.
इतकेच नाही तर कालिकादेवीचे चित्र रांगोळी मध्ये रेखाटलेले पाहिले तर साक्षात् देवी प्रकट झाले असे वाटते. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आ. अभय पाटील यांचे चित्रही रांगोळीत फुलले होते आणि ‘रिअल हिरो’ या शब्दाचाही तिथे उल्लेख होता
बेळगाव दक्षिण मतदारसंघातील 25 प्रभागांमध्ये ही स्पर्धा झाली आणि 22123 महिलांनी भाग घेतला होता स्पर्धेचे आयोजन अतिशय नीटनेटके होते .यामध्ये भाजपचे नगर सेवक व कार्यकर्ते सक्रिय होते. स्पर्धेची माहिती
मतदारसंघातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचे काम यापूर्वी करण्यात आले होते. नंतर संबंधित प्रभागाशी संबंधित नसलेल्या तज्ज्ञांची परीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे ही स्पर्धा यशस्वी ठरली.
Very nice 👍