बेळगांव दक्षिण आमदार अभय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या कार्यकर्त्यांनी विजापुर येथे स्वच्छता मोहीम राबवली. आमदार अभय पाटील यांच्या नेतृत्वाखाली 2004 पासून बेळगाव शहरात दर रविवारी “स्वच्छता अभियान” राबविण्यात येत आहे.
विजापूर महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विजापूर येथे असलेले आमदार अभय पाटील यांनीही येथे स्वच्छता मोहीम राबवली आहे.घुम्मट नगरी येथील श्री जगज्योती बसवेश्वर, श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि महान संत कनकदास यांच्या प्रतिमेला पाण्याने स्वच्छ करण्यात आले. या तीन वृत भोवती स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
यातून अभय पाटील यांच्या नेतृत्वाखालील संघाने विजापूर शहरातील जनतेची दाद मिळवली आहे. अभय पाटील यांनी अशा वेगवेगळ्या नावीन्यपूर्ण आणि सृजनशील उपक्रमातून संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे, अस म्हटलं तर काही गैर नाही.