अद्यापही सामाजिक समता शक्य झालेली नाही:मुख्यमंत्री सिद्धरामय्या
बेळगांव – जातीव्यवस्था नष्ट करूनच आर्थिक स्वातंत्र्य आणि समता शक्य आहे. बाराव्या शतकात जातिव्यवस्थेविरुद्ध क्रांती होऊनही आजतागायत सामाजिक समता शक्य झालेली नाही.
त्यामुळे आमचे सरकार सामाजिक समतेच्या तत्त्वावर आधारित कार्यक्रम राबवत असल्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले.
बेळगाव जिल्हा प्रशासन, कित्तूर विकास प्राधिकरण आणि कन्नड आणि संस्कृती विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कित्तूर किल्ला परिसरात तीन दिवस आयोजित करण्यात आलेल्या कित्तूरू उत्सव आणि राणी चन्नम्मा विजयोत्सवाच्या 200 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
बलाढ्य इंग्रजांविरुद्धच्या वीर राणी कित्तूर चन्नमा यांनी संघर्ष केल. चन्नम्मांनी पुकारलेल्या इंग्रजांविरोधाच्या लढ्यात रायण्णा आणि बाळप्पा एकत्र होते. देशभक्ती जोपासण्यासाठीचा त्यांचा लढा प्रेरणादायी आहे.
जाती धर्मा ऐवजी प्रत्येकाने एकमेकांवर प्रेम करून देशभक्ती दाखवली पाहिजे. असेही मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले.