पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर

पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर

नवी दिल्ली :

भारतीय निवडणूक आयोगाने आज पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीआधी मिझोराम, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान आणि तेलंगणा या राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. याबाबतचं वेळापत्रक निवडणूक आयोगाने जाहीर केलं. मिझोराममधून १३ ऑक्टोबरपासून निवडणूक प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. सर्व पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी ३ डिसेंबर रोजी केली जाणार आहे.

मिझोराम विधानसभा निवडणुकीचं मतदान ७ नोव्हेंबर घेतलं जाणार आहे. तर छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यात निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार आहे. ७ नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान तर १७ नोव्हेंबरला दुसऱ्या टप्प्यातील मतदान घेतलं जाणार आहे. दरम्यान, मध्य प्रदेश- १७ नोव्हेंबर, राज्यस्थान – २३ नोव्हेंबर आणि तेलंगणात ३० नोव्हेंबर रोजी मतदान घेतलं जाणार आहे, याबाबतची माहिती निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous post हिंडलगा तुरुंगात स्फोट घडवण्याची धमकी…!!
Next post बेळगांवकर सावध व्हा!! आता रस्ते बंद होणार