पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ईमेल द्वारे मारण्याची द्वार धमकी;माजी आय.आय.टी विद्यार्थ्याला अटक
28 नोव्हेंबर 22 .
सकाळी १०:३८
नवी दिल्ली: गुजरातच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) पंतप्रधान नरेंद्र मोदींना धमकावल्याच्या आरोपाखाली 28 वर्षीय माजी आयआयटी विद्यार्थ्याला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमन सक्सेना असे तरुणाचे नाव आहे.सक्शेना यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धमकीचा ई-मेल पाठवला होता.
या आरोपात सक्शेनाला गुजरात एटीएसच्या अधिकाऱ्यांनी उत्तर प्रदेशातील बुदौन जिल्ह्यातील त्याच्या वडिलांच्या घरातून अटक केली आहे.
गुजरातच्या दहशतवादविरोधी पथकाने आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी संयुक्त छापा टाकून सक्शेनाला अटक केली.
पंतप्रधान मोदींना ई-मेलद्वारे धमकावल्याप्रकरणी गुजरातमधील सक्शेनाला ,एक महिला आणि तिचा दिल्लीस्थित प्रियकर यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.