बेळगाव –
बेळगाव ग्रामीण मतदारसंघात भाजपच्या विजयासाठी माजी मंत्री रमेश जारकीहोळी जंगी तय्यारी .
हिंडलगा पंचायतीचे अध्यक्ष नागेश मन्नोलकारा यांना घेऊन बंगळुरूला जाऊन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची भेट घेतल्यानंतर , आज त्यांनी ग्रामीण मतदारसंघ असलेल्या सांबरा येथे भाजप नेत्यांची बैठक घेतली.
रमेश जारकीहोळी यांनी आज सकाळी बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील सांबरा गावाला भेट दिली.सुळेभावीसांब्रमरीहाळ, बाळेकुंद्री, मोदगा यासह आजूबाजूच्या गावांतील महत्त्वाच्या भाजप नेत्यांची त्यांनी बैठक घेतली आहे.
येत्या विधानसभा निवडणुकीत बेळगाव ग्रामीण मतदारसंघात भाजपच्या विजयासाठी या मतदारसंघातील भाजप नेत्यांनी संघटित होऊन भाजप संघटन मजबूत करण्यासाठी मेहनत घ्यावी, असे आवाहन रमेश जारकीहोळी यांनी बैठकीत केल्याचे कळते.