खेलो इंडिया दक्षिण विभागीय ज्युडोत बेळगावच्या मुलींची बाजी
बेळगाव :
तमिळनाडू येथील चेन्नई येथे झालेल्या खेलो इंडिया साउथ झोनच्या वुमन्स लीग 2024 स्पर्धेत बेळगाव डी वाय एस स्पोर्ट्स हॉस्टेलच्या मुलींनी घवघवीत संपादन केले आहे. बेळगावच्या खेळाडूंनी 7 सुवर्ण पदके, 2 रौप्य पदके आणि 3 कांस्यपदकाची कमाई करत दोन सर्वसामान्य उपयोजित पदा कॅडेट आणि सीनियर गटात मिळवल्या या या संघाला 56 हजार रुपयांचे रोग बक्षीस ही देण्यात आले.
या स्पर्धेत यश मिळवलेल्या खेळाडूंना, बेळगाव डीवायएस स्पोर्ट्सचे उपसंचालक श्रीनिवास, एन आय एस कोच एकलव्य पुरस्कार विजेत्या आंतरराष्ट्रीय जुडो खेळाडू रोहिणी पाटील आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू कुतुजा मुलतानी यांचे मार्गदर्शन लाभले. हे सर्व खेळाडू बेळगावच्या डी वाय एस हॉस्टेलमध्ये सराव करत असतात.
चेन्नई येथील झालेल्या स्पर्धेत पदक मिळालेल्या खेळाडू खालील प्रमाणे आहेतः
संजना शेठ 63 किलो वजनी गट : दोन सुवर्ण एक कांस्य 15 हजार रोख बक्षीसःश्वेता अलकनूर 44 किलो वजनी गट : एक गोल्ड, 6 हजार रोख रक्कम बक्षीस : सोनालिका सीएस 48 किलो वजनी गट : 1 सुवर्णपदक 6000 रोख रक्कमसहाना एस आर 63 किलो वजनी गट : एक सुवर्णपदक 6 हजार रोख रक्कम : आलिया मुलतानी 48 किलो वजन गट : एक गोल्ड मेडल 5 हजार रोख रक्कम बक्षीस; दिया पाटील 48 किलो वजन गट : 6000 रोख रक्कम बक्षीस.
आफरीन बनू 63 किलो वजन गट : एक रौप्य पदक चार हजार रुपये रोख रक्कम; राधिका डुकरे 70 किलो वजन गट : एक रुपये पदक 4000 रोख रक्कमः अश्विनी 28 किलो वजन गट : 1 कांस्य पदक 1000 रुपये रोख रक्कम
रुकमव्वा 32 किलो वजन गट : एक ब्रांझ मेडल 1000 रुपये रक्कम: वैष्णवी 52 किलो वजन गट : एक हजार रुपये रोख रक्कम