कर्नाटकचा मुख्यमंत्री ठरविण्यात महाराष्ट्राच्या काँग्रेस नेत्यांची महत्वाची भूमिका
बेंगलोर वृत्त
कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने 136 जागा जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. विधानसभा निवडणुकीत एकहाती विजय मिळवल्यानंतर कर्नाटकचा पुढचा मुख्यमंत्री कोण, असा प्रश्न विचारला जात होत. या ऐतिहासिक कामगिरीचे हिरो असलेले माजी मुख्यमंत्री सिद्धरमय्या आणि प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार या दोघांची नावे मुख्यमंत्रिपदासाठी आघाडीवर होती. तो तिढा सोडविण्यासाठी काँग्रेसने पक्षनिरीक्षक म्हणून माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यावर जबाबदारी टाकली होती. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी या नियुक्तीला दुजोरा दिला . कर्नाटकचा मुख्यमंत्री निवडीपर्यंत शिंदे हे बंगळुरूमध्ये ठाण मांडून बसणार आहेत. मुख्यमंत्रीपदाचा तिढा सोडविण्याची मोठी जबाबदारी शिंदे आणि त्यांच्या दोन जोडीदारांवर टाकण्यात आलेली आहे.
कर्नाटकात आता सत्तास्थापनेला वेग आलेला आहे. त्यामुळेच पक्षनिरीक्षक म्हणून सुशीलकुमार शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली. शिंदे यांच्यासोबत दोन सहनिरीक्षक होते