गोव्यातील तृणमूल काँग्रेसचे खासदार लुइझिन फालेरो यांचा राजीनामा

पणजी :

तृणमूल काँग्रेसचे खासदार आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुइझिन फालेरो यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी स्वीकारला आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

तृणमूल पक्षातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फालेरो यांनी २०२२ मधील गोवा विधानसभा निवडणुकीत फातोर्डा मतदारसंघातून गोवा फॉरवर्ड पक्षाचे विजय सरदेसाई यांच्या विरोधात निवडणूक लढण्यास नकार दिला होता.

यामुळे ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल पक्षाने फालेरो यांनी घेतलेल्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली होती. राज्यसभेच्या खासदार अर्पिता घोष यांचा कार्यकाळ २०२६ पर्यंत होता. पण त्यांच्या राजीनाम्यानंतर २०२१ मध्ये फालेरो यांना तृणमूल काँग्रेसची उमेदवारी दिली होती.

त्यांची राज्यसभा खासदारपदी बिनविरोध निवड झाली होती. तृणमूल पक्षा गोव्यात मजबूत होण्यासाठी फालेरो यांना राज्यसभेत प्रतिनिधीत्व देण्यात आले होते. पण फालेरो यांच्या राजीनाम्याने तृणमूल काँग्रेसला धक्का बसला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous post माजी मंत्री के. एस. ईश्वरप्पा राजकारणातून निवृत्त
Next post भाजपाची 189 उमेदवारांची पहिली यादी जाहीर .