शिमोगा :
विधानसभा निवडणुका जवळ येत असताना भाजपमध्ये महत्त्वपूर्ण घडामोडी घडली असून माजी मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांनी राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे. माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्यानंतर माजी मंत्री ईश्वरप्पा जे आता भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत.
त्यांनी निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली आहे, त्यामुळे सर्व आश्चर्यचकित झाले आहेत. ईश्वरप्पा यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना पत्र लिहून निवडणुकीच्या राजकारणातून संन्यास घ्यायचा असून यापुढे कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याचे म्हटले आहे.
निवडणुकीच्या राजकारणातून मी स्वेच्छेने निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला असून यापुढे कोणतीही निवडणूक लढवणार नाही. विधानसभा निवडणुकीसाठी कोणत्याही मतदारसंघासाठी माझ्या नावाचा विचार करू नये ही विनंती. गेल्या 40 वर्षांत मला भाजपमध्ये अनेक पदे आणि भाजप जबाबदाऱ्या दिल्या आहेत. त्याबद्दल भाजपचे आभार मानल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.