.. आणि आ. सतीश जारकीहोळी यांची बोलती बंद….
गेल्या महिन्यात सतीश जारकीहोळी यांनी हिंदुत्वाबाबत वादग्रस्त वक्तव्य करून वादात सापडले होते.
सतीश जारकीहोळी यांना मंगळवारी पुन्हा एकदा मराठा समाजाचा रोष सामना करावा लागला.
सकल मराठा समाजाच्या वतीने सुवर्ण सौदवर काढण्यात आलेल्या भव्य मराठा मोर्चात त्यांनी मोर्चेकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला.
पण हिंदुत्वाबरोबरच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांच्याबद्दल केलेले अपमानास्पद वक्तव्य जनता विसरलेली नाही.
सतीश जारकीहोळी बोलण्यासाठी उभे राहिले असता त्यांनी घोषणाबाजी करत बोलण्याची संधी नाकारली.
हर हर महादेव आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणत त्यांनी आसमंत दणाणून सोडला.
मराठा समाज बांधवांचा हा अवतार पाहून सतीश जारकीहोळी पुढे बोलू शकले नाहीत.
त्यामुळे त्यांना न बोलता पोलिस संरक्षणात परतावे लागले.